तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील अभियांञिकीच्या विद्यार्थ्याना कॅरी ऑन तात्काळ लागू करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या वतीने दि.११ मंगळवार रोजी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य यांच्या मार्फत डाँ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु औरंगाबाद यांच्याकडे देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष स.न.2018/19 मध्ये वर्तमान पॅटर्ननुसार शिकत असलेली सध्याची तृतीय आणि चतुर्थ वर्षाची ही बँच शेवटची आहे. मागील वर्षाच्या शासन निर्णयनुसार विद्यार्थ्यांना कॅरिऑन लागू केला नाही तर या विद्यार्थ्यांना अनेक समस्याना सामोरे जावे लागणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सर्वच विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षातुन तृतीय वर्षात व तृतीय वर्षातुन अंतीम वर्षात अनुक्रमे कॅरिऑन अंतर्गत प्रवेश द्यावा आणि त्यांच्या लेखी-प्रात्यक्षिक तसेच टेस्ट - टर्मवर्क पुर्ण करण्यासाठी पाञ समजण्यात यावे, परिपञक अभ्यासक्रम विभाग /अभियांत्रिकी कँरिआँन ३१/२०१७ / ४९७२-५००१ हे मागील वर्षाचे परिपञक काही सुधारणासह या वर्षी लागु करण्यात यावे, कुलगुरु यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात येत्या चार ते पाच दिवसात योग्य ते निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा विद्यार्थी काँग्रेस उस्मानाबाद च्या वतीने विद्यापीठाच्या उपकेद्रांसमोर अमरण उपोषण करण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

या  निवेदनावर राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष करण कल्याणराव सांळुके, शुभम पाटील, गणेश मोरे, कल्याण कोरे, विशाल वाघमारे, संकर्षण देशमुख, राज खपले, रोहित कानडे, विशाल वाघमारे, सारंग साळुंके, शुभम गाजरे आदीसह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top