नळदुर्ग (सचिन गायकवाड) :-
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाच्या वतीने विविध मागण्याच्या अंनुशगाने एक दिवसीय नैमितिक रजा आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या वतीने १७ जुन २०१८ च्या निर्णयानुसार वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी या आंदोलनाचा एक टप्पा म्हणून दि.११.९.२०१८ मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्यभरातील सर्व प्राध्यापक सामुहिक एक दिवसीय रजेवरती होते. याचाच भाग म्हणून नळदुर्ग येथील कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक एक दिवसीय सामुहिक रजेमध्ये शंभर टक्के सहभाग नोंदविला.