नळदुर्ग : सचिन गायकवाड 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा महोत्सव आंतरमहाविद्यालयीन खो - खो स्पर्धा दि 21 व 22 सप्टेंबर या दोन दिवसीय खो - खो स्पर्धेचे आयोजन नळदुर्गयेथील कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, येथे  आयोजन करण्यात आले होते.

दि. 22 रोजी मुलांच्या खो - खो स्पर्धेत बी.पी.एङ कॉलेज कळंब विरूद्ध कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांच्यात हा समान अत्यंत चुरशीची लढतीत झाला. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग या महाविद्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन खो - खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत जेतेपदावर नाव कोरले आहे. तर बी.पीएङ कॉलेज कळंब या खो - खो संघाला द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर मुलींच्या संघातून देवगिरी कॉलेज औरंगाबाद महाविद्यालय या संघाने प्रथम क्रमांकाचे जेतेपद पटकावले आहे. तर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग या महाविद्यालयाने मुलीच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविले आहे. 

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. अभयकुमार शहापूरकर, प्रकाश चौगुले, शहबाज काझी, अॅड. प्रदीप मंटगे, लिंबराज कोरेकर प्रा. चंद्रजीत जाधव, प्राचार्य मोहन बाबरे यांच्या हस्ते देण्यात आले. 

यावेळी क्रिडा विभाग प्रमुख के.एस. सोनटक्के, आर. के. ढोकळे, यु.एन.भाले , एस. एस. शिंदे, ए.जी. हंगरगेकर, यु . बी.चनशेट्टी, एस. एस. राठोड, विजय सुरवसे,  सुरेश गायकवाड, महादेव ङुकरे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्राचार्य मोहन बाबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले.
 
Top