उस्मानाबाद :
तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे पशुवैद्यकीय चिकित्सालय मंजूर करून इमारतीसाठी दोन कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी राज्याचे दुग्धविकास, पशूसंवर्धन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे सोमवार दि. 17 सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे़.
निवेदनात म्हटले की, सारोळा (बुद्रुक) हे जवळपास ७ हजार लोकसंख्येचे गाव आहे़. गावात पशुपालक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे़ शेतीबरोबरच दुग्धव्यवसायावरच शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भागतो़ मात्र गावात पशुवैद्यकीय चिकित्सालयाची सोय नाही़ अनेकवेळा आजाराचे वेळेत निदान व उपचार न मिळाल्याने शेतकऱ्यांना पशुधन गमवावे लागत आहे़ शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे़ त्यामुळे गावात पशुवैद्यकीय चिकित्सालय मंजूर करण्याची मागणी करण्यात आली़ यावेळी खा़ रविंद्र गायकवाड, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे आदींची उपस्थित होती.