अक्कलकोट : रियाज सय्यद
अक्कलकोट शहर व तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती पुढील शैक्षणिक वर्षापासून देणार असल्याची घोषणा श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांनी लोकमंगल समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केली. या अध्यक्षस्थानी युवा नेते रोहन देशमुख होते तर प्रमुख पाहूणे म्हणून जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भारूड उपस्थित होते.
लोकमंगल बॅंक सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ जन्मेजय राजे भोसले यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांना सहा लाख रूपयांची शैक्षणिक मदत करण्यात आली. डॉ. भारूड यांनी शैक्षणिक आर्थिक मदत उपक्रमा बध्दल आनंद व्यक्त केला.गरीब गरजू विद्यार्थ्यांना ही मदत आयुष्यात यशोशिखराकडे नेणारी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. जन्मेजय राजे भोसले म्हणाले ना. सुभाष देशमुख यांनी नेहमीच समाजातील उपेक्षिताना गरीब गरजूना विविध उपक्रमातून मदत केली आहे करीत आहेत. त्यांचा आदर्श घेवून मी पुढील शैक्षणिक वर्षा पासून दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती गरीब गरजू विद्यार्थ्यांना देणार आहे.
या कार्यक्रमाला अन्नछञ सचिव शाम मोरे सदस्य दत्तात्रय जाधव फत्तेसिंह शिक्षण संस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर अन्नछञ विश्वस्त संतोष भोसले प्रशांत साठे बाळासाहेब देसाई-कुलकर्णी अश्पाक काझी आदी उपस्थित होते.
