उस्मानाबाद : शहाजी आगळे

मेंडसिंगा (ता.जि. उस्मानाबाद) परिसरातील सोयाबीन पिकासह खरीब हंगामातील इतर पिके पावसाअभावी कुरपू लागली आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनच या परिसरात पाऊस कमी प्रमाणात होता. त्यामुळे पेरणी उशिरा झाली होती. पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनसह इतर पिके करपू लागली आहेत. दिवसभर कडक ऊन पडत असल्यामुळे शेतक-यावर संपूर्ण पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील मेडसिंगा परिसरातील पन्नास ते साठ टक्के शिवार हा खरीप हंगामाचा आहे. त्याचबरोबर हे पीक शेतक-यांच्या आर्थिक उत्पन्नाचे असल्यामुळे शेतक-यांची आर्थिक परिस्थिती कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे उत्पन्न कमी प्रमाणात झाले होते. त्यामुळे शासनाचा हमीभाव असून सुध्दा व्यापा-यांनी ते कमी दरात घेतले हेाते.



सलग दोन वर्षापासून शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. त्यातुनच गेल्यावर्षीच्या सोयाबीनचा पीकविमा न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतक-यांतून होत आहे. 


 
Top