नारायण देवराव साळुंके

लोहारा : इकबाल मुल्ला

सालेगाव ता. लोहारा येथील एका 65 वर्षीय शेतक-याने दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व कर्जबारीपणाला कंटाळून गफळास घेवून आत्महत्य केल्याची घटना गुरुवार दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी लोहारा पोलीसात आकस्मता मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

नारायण देवराव साळुंके (वय 65 वर्षे, रा. सालेगाव, ता. लोहारा) आसे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. यातील नारायण साळुंके याना एक एकर स्वतःची शेतजमीन असून त्यांनी यंदा खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी ५० हजार रुपये हातऊसणे घेतले होते. तसेच सहकारी सोसायटीचे १० हजार रुपये कर्ज घेतले होते. परंतू मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने हाता तोंडाशी आलेली पिके करपून गेली. त्यामुळे ५० हजार रुपये व सहकारी सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून साळुंके यांनी स्वतःच्या राहत्या घरातील भिंतीच्या खुंटीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत लोहारा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 
Top