काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर  तालुक्यातील जळकोटवाडी  येथील गरीब  कुटुंबातील शेतकरी  कै.बबन अंबादास  बोबडे वय ( 51) यांचे  वीस दिवसापुर्वी  रात्रीच्या वेळी  शेताकडे  जात असताना  वाटेच्या कडेला असलेल्या  विहिरीचा अंदाज न आल्याने  शेतातील  विहिरीत  पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे बोबडे कुटूंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला  असून घरातील  कर्ता  पुरुषच गेल्याने   सर्वत्र  हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत बबन  बोबडे  यांच्या  पश्चात  आई,  पत्नी, एक मुलगी,  एक  मुलगा  असा परिवार आहे.  

या दु:खद घटनेची माहिती  मिळताच  राष्ट्रवादीचे  नेते अशोक  जगदाळे यांनी बोबडे कुटंबियाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच मयत बबन अंबादास  बोबडे  यांच्या  कुटुंबास   सर्वतोपरी मदत करणार  असल्याचे  सांगून त्यांच्या  मुलीच्या लग्नाची जबाबदारी  घेऊन कन्यादान मी स्वतः  करणार  असल्याचे  त्यांनी  यावेळी सांगितले. 

यावेळी जिल्हापरिषद सदस्य सदस्य राजकुमार पाटील, संजय फंड, उपसरपंच जालींदर  देशमुख, इंद्रजित फंड, बाबासाहेब बोबडे, सुदाम बंडगर, माजी नगरसेवक संजय बताले, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते.

 
Top