नळदुर्ग : सचिन गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे शासनाच्या "स्वच्छता ही सेवा" अभियानास ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवार दि. 28 सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात आले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच "स्वच्छता हि सेवा " अभियानाला सुरुवात झाली असून तुळजापूर तालुक्यातील गावोगावी उत्सपुर्तपणे हे अभियान राबविले जात आहे. लोहगाव येथील गावातील मुख्य रस्ते शासकीय निमशासकीय इमारती शाळा परिसर स्वच्छ करून या मोहिमेत ग्रामस्थ महिला सहभाग नोंदविला आहे.
यावेळी ग्रामसेवक खुंटगावे, सरपंच लोचना दबडे, उपसरपंच प्रशांत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख,रू गक्मीण लांडगे, राजेंद्र वाघमोडे,सौदागर दबडे,सुनिल पाटिल,अमोल शिंगाडे,रविंद्र दबडे, प्रविण पाटील, सातलिंग पाटिल, अतुल पाटिल, संजय घोडके,मारूती बनसोडे, हणमंत लांडगे,बालाजी दबडे,आरविंद दबडे,करबसु कलशेट्टी,नितीन काटकर, यांच्यासह ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला होता.
