अक्कलकोट : रियाज सय्यद

दिगंबर थोरले जैन मंदिर यांच्यावतीने पर्यूषण पर्वनिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरुन वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखी सोहळ्याचे सौभाग्यवतींनी, भाविकांनी जलकुंभाद्वारे जलार्पण केले. पंचारतीने पालखीचे पूजन केले. 

हा पालखी सोहळा शहरातील मेन रोड, सेंट्रल चौक, कापड बाजार, उत्तर पोलिस चौकीसमोर कारंजा चौक, विभुते घर, एखंडे घर येथे पूजन होऊन पुन्हा कारंजा चौकातून सुभाष गल्ली, मधला मारुती, राम गल्ली, फत्तेसिंह चौका मार्गे मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाले. या पीषण पर्व पालखी सोहळ्यामध्ये डॉ. संतोष मेहता, अँड, हर्षवर्धन एखंडे, प्रशांत विभुते, अन्नछत्र मंडळाचे - उपाध्यक्ष अभय खोबरे, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे , विलास गडदे, रोहित खोबरे, स्वप्नील आळंद, राजकुमार विभुते, अभिनंदन गांधी, प्रवीण शहा, किशोर शहा, अजित शहा, युवराज अळ्ळे, स्वप्ना शहा, विजया शहा, विद्या विभुते, प्रज्ञा मेहता, राहुल गांधी, विराग दोशी, अभिनंदन गांधी, रुपाची शहा, अशोक येणगुरे, रवि शहा, संदेश शहा, प्रतिक मेहता, भूषण शहा, सुयश शहा, ऋषिकेश शहा, निखिल मेहता, अरिंजय गांधी आदी संमती सेवादलाचे सर्व कार्यकर्ते, समाज बांधव, महिला मंडळ मोठ्या प्रमाणात भक्तगण सामिल होते.

 
Top