तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर तालुक्यातील राखेल येथे क्षुल्लक कारणावरुन आठ जणांनी मिळुन तिघास लाकडी काठीने व सळईने डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार दि. 25 सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तुळजापुर पोलीस ठाण्यात आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस सुञाकडुन मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील राखेल येथील अनिता हणमंतराव गवळी व त्यांचा मुलगा, पुतण्या हे भाच्याच्या वाढदिवसाकरिता गावातुन जात असताना शशीकांत विष्णू भगत, शुभम पांडुरंग भगत, सुर्यकांत विष्णू भगत, विष्णू तुकाराम भगत, पार्वती पांडुरंग भगत, अजय पांडुरंग भगत, वंदना विष्णू भगत, रेणुका शशीकांत भगत सर्व रा.राखेल ता.तुळजापुर यांच्यात क्षुल्लक कारणावरुन बाचाबाची होवुन यामध्ये अनिता गवळी व त्यांच्या पुतण्यास वरील आठ लोकांनी लाकडी काठीने, सळईने मारहाण करुन डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी अनिता हणमंतराव गवळी यांच्या फिर्यादीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात आठ जना विरोधात गु..न.305/कलम 143, 147,148,326,324,504,506 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पो.ना.माने हे करीत आहेत.
