तुळजापूर : कुमार नाईकवाडी
सिंदफळ ता. तुळजापूर येथील शिवारात असलेल्या एका धाब्यावर पोलीसांनी धाड टाकून विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेल्या बिअरसह विेदेशी दारुचा साठा जप्त केला. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल सुमारे 43 हजार रुपयांचा आहे. याप्रकरणी हॉटेल मालकासह तिघा विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरानजीक घाटशिळ पायथ्याला सिंदफळ शिवारात असलेल्या हॉटेल चंद्रलोक ढाब्यावर शनिवार (दि.22) सायंकाळी 06:20 च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप घुगे यांच्या पथकाने धाड टाकली. या वेळी विनापरवाना बेकायदा विक्री साठी ठेवण्यात आलेला विविध आठ प्रकारचा विदेशी दारू चा साठा, बीअर चा 175 बाटल्या व फ्रिज असा एकूण 42 हजार 910 रूपयांचा मुद्दे माल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदिप शंकर भुतेकर यांच्या फिर्यादीवरुन शिवाजी रामचंद्र व्हनकवडे, रा. शिंगेडगाव जि.सोलापूर, विनोद दत्तात्रय बेले रा. तुळजापूर व हॉटेल चंद्रलोक ढाब्याचा मालक या तिघांविरोधात तुळजापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
