तुळजापुर : कुमार नाईकवाडी

येथील उस्मानाबाद रोड वरील इच्छापुर्ती गणपती मंदीरातील चांदीचे ताट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवार दि. 24 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरुध्द तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलीस सुञाकडुन मिळालेली माहिती अशी की,  सोमवार दि. २४ सप्टेंबर रोजी मध्यराञी दोन वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद रोड वरील भागात इच्छापुर्ती गणपती मंदीरातील मुर्ती समोर रोजच्या पुजेसाठी ठेवण्यात आलेले ४,५०० रुपये किमंतीचे ज्ञात चोरट्यानी मंदीराचे शटर चे कुलुप तोडून चोरुन नेले. सेच मंदीरा समोर ठेवण्यात आलेल्या पेटी वर ही चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला माञ तो प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण मंदीरा समोर ठेवण्यात आलेली लोखंडी पेटी जाड असल्यामुळे त्यांना पेटी तोडता आली नाही. 

तुळजापुरात दिवसेन दिवस अज्ञात चोरट्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असताना त्या मध्ये आता तर चक्क श्री  गणरायाच्या मंदीरावरती अज्ञात चोरटे डल्ला मारत असल्याने याचे आश्चर्य होत आहे. री तुळजापुरात पोलीसांनी गस्त वाढवुन अज्ञात  चोरट्यावर जरब बसवावी अशी मागणी शहर वासियातुन होत आहे. 
श्री ईच्छा पुर्ती गणपती समोर झालेल्या चोरीमुळे कल्याण तुकाराम तोडकरी रा.तुळजापुर  यांच्या फिर्यावरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.न.298/18 कलम 379 भा.द.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पो.काँ.चाफेकर करीत आहेत.
 
Top