नळदुर्ग :
येथील ऐतिहासिक किल्ल्यास जल अभ्यासक प्रफुल्ल कदम यांनी शुक्रवार दि. 21 सप्टेंबर रोजी भेट देवून किल्ल्याची व ऐतहासिक वास्तूची माहिती जाणून घेतली.
खूप दिवसापासून नळदुर्ग किल्ला पाहण्याची इच्छा होती. आज किल्ल्यास भेट दिल्यानंतर आश्चर्य वाटले. स्थानिक व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या कार्याचे आणि घेतलेल्या कष्टाचे कौतुक वाटले. चांगल्या कामाचे हे उदाहरण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचणे अत्यंत गरजेचे वाटते. या किल्ल्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने चाललेली वाटचाल कौतुकास्पद आहे. राज्य व केंद्रशासनाने यामध्ये अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. ऐतिहासिक माहिती उपलब्ध होणे आणि त्या माहितीचे सादरिकरण या किल्ल्यामध्ये करणे यासाठी विशेष प्रयत्न घेतल्यास हा किल्ला केवळ प्रेक्षकीय नव्हे तर नक्कीच प्रेरणादायी होईल, अशी प्रतिक्रिया कदम यांनी यावेळी देवून या किल्ल्याच्या सुशोभिकरणाबद्दल युनिटीचे मुख्य संचालक कफील मौलवी, भरत जैन, जयधवल करमरकर यांचे अभिनंदन केले.
यावेळी युनिटिचे कर्मचारी जुबेर काझी, हाजी शेख, मुस्ताक जमादार, शाहीद सय्यद आदीजण उपस्थित होते.
