नळदुर्ग : सचिन गायकवाड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि 21 व 22 सप्टेंबर या दोन दिवसीय खो - खो स्पर्धेचे आयोजन नळदुर्ग येथील कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, येथे करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे सदस्य संभाजी पाटील बाभळगावकर, रामचंद्रआलुरे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी प्राचार्य, मोहन बाबरे , एस. एस राठोड, संतोष पवार, क्रीडा विभाग प्रमुख कपिल सोनटक्के उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन खो - खो स्पर्धेत मुलांच्या 18 संघानी तर मुलींच्या 6 संघानी सहभाग नोंदवला चालु आसलेल्या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोलाचे योगदान दिले.
