तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :-  

जुलै महिन्यामध्ये तुळजापुरातील मथुराई नगर मध्ये घरफोडी करुन अज्ञात चोरटयानी रोख रक्कम व रिव्हॉल्वर लांबविलेले होते. घरफोडीतील रिव्हॉल्वर तुळजापूर पोलिसांनी जवळपास दोन महिन्यानी गुरुवार दि. 6 सप्टेंबर रोजी हस्तगत केले.

तुळजापूर येथील मथुराई नगर मधील विजयकुमार पांडुरंग कुलकर्णी यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरटयांनी जुलै महिन्यात घराचा कडी कोंडा उचकटून व कुलूप तोडून घरातील 2 लाख रुपये रोख रक्कम,  ३२ बोअरची व्हेवली अँड स्कॉटलँड मेड इन इंग्लड कंपनीची रिव्हॉल्वर चोरुन नेले होते. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल गुन्हा झाला होता. पोलिसांनी तपास करुन  होवून सदरचा गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे हे करीत होते. चोरी झालेली रिव्हॉल्वर गुरुवार दि. 6 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली असून ती वर्ग करण्यात आली आहे. 

सदर गुन्हयाचे तपासात सदरचा गुन्हा हा गणेश उर्फ गणपती शेषेराव गायकवाड, (वय २३ वर्षे, रा.हासेगांव, ता.औसा, जि.लातूर), अमोल विलास जाधव (वय २४ वर्षे), आकाश विक्रम बुधवडे (वय २४ वर्षे, दोघे रा.लातूर) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी गणेश व आकाश याने अशाच प्रकारचा घरफोडया लातूर येथे केल्याने तसेच आरोपी अमोल जाधव हा घरफोडया करण्यात सराईत गुन्हेगार असल्याने त्यास गांधी चौकी, पोलीस ठाणे, लातूर शहर यांचेकडील गु.र.नं. ९८/१८ या गुन्हयामध्ये वरील दोन्ही आरोपीस अटक केली होती. त्यावेळी त्यांनी तुळजापूर येथे चोरी केलेली रिव्हॉल्वर काढून दिल्याने जप्त करण्यात आलेली होती. सदरचे दोन्ही आरोपी हे सध्या पोलीस ठाणे, तुळजापूर येथे पोलीस कोठडीमध्ये असून सदरची चोरी झालेली रिव्हॉल्वर गुरुवार दि. ६ रोजी वर्ग होवून प्राप्त झाली आहे.

सदर गुन्हयाचा अधिक तपास आर.राजा पोलीस अधिक्षक उस्मानाबाद, भोर मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक, उस्मानाबाद आणि संदीप घुगे, सहाय्यक पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सुर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे व कर्मचारी हे करीत आहेत.

 
Top