उस्मानाबाद :- तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे तरूणांसाठी सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक जिमचे लोकार्पण आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले़. यावेळी आ़ ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले़.

सारोळी गावातील जिल्हा परिषदेत शाळेत ही अत्याधुनिक जिम सुरू करण्यात आली आहे़. कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, भाजपा मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, भाजयुमाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, भाजपा नेते ॲड़ व्यंकटराव गुंड, ॲड़ खंडेराव चौरे, ॲड़ राम गरड, जिप सदस्य ज्ञानदेव राजगुरू, ॲड़ नितीन भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश देवगिरे, रमेश रणदिवे, सरपंच प्रशांत रणदिवे, उपसरपंच भाग्यश्री देवगिरे, शिवगर्जना हेल्थ क्बलचे संस्थापक विनोद बाकले, ज्योती देवगिरे, इंद्रजित देवकते, रिपाइंचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, ग्रामसेवक मुंढे तानाजी पाटील, कलिम शेख, राहूल कापसे, तुषार चव्हाण, बबलू रणदिवे, समाधान काकडे, पांडूरंग रणदिवे, दत्ता बगाडे, शैलेश शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़. 

 
Top