तुळजापूर :- जिल्हा परिषद प्रशाला मंगरूळ ता. तुळजापूर येथे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या संकल्पनेतून त्यांना इयत्ता पहिली ते दहावी म्हणजे 1977-1978 ते 1987-1988 पर्यंत ज्या ज्या शिक्षकांनी शिकवले मार्गदर्शन केले. अशा शिक्षक गुरूजनांचा महेंद्र धुरगुडे यांनी सत्कार करुन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सत्काराचे स्वरूप फेटा , शाल , पुष्पहार, वही, पेन आणि शिवाजी महाराज यांच्या माहितीचे पुस्तक असे होते.
यावेळी या सत्कार समारंभात मनोगत व्यक्त करताना सर्व शिक्षकांनी महेंद्र धुरगुडे यांचे कौतुक करुन ते पुढे म्हणाले की, आज आम्ही सर्वजण जवळपास 30 वर्षानंतर भेटतोय हा योगायोग आमचे लाडके विद्यार्थी महेंद्र धुरगुडे यांनी साकारलेल्या संकल्पनेतून या शिक्षक दिनाच्या निमित्ताने घडुन आला.
शिक्षण झाल्यानंतर शिष्य आपल्या गुरांना गुरुदक्षणा देत असतो. महेंद्र धुरगुडे यांनी गुरुदक्षणा देऊन खऱ्या अर्थाने शिक्षक दिनाच्या आम्हा सर्व शिक्षक बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभ पार पडल्यानंतर महेंद्र धुरगुडे यांनी सर्व गुरुवर्य शिक्षक बांधवांसाठी मनपसंतीचे स्नेहभोजनाच्या कार्यक्रम आयोजित केला होता. या शिक्षक बांधवांनी स्नेहभोजन करुन निरोप घेतला.
सत्कारमूर्ती शिक्षक :
अशोक नारायण जोशी, गोपाळ लालाजी चव्हाण, उद्धवराव विश्वनाथ साळुंखे, सुज्ञान शामराव कांबळे, दादाराव दत्तोबा साबळे, गुंडोपंत संभाजी डोंगरे, रमेश शिवराम रेणके, सौ. मंदाकिनी दादाराव साबळे, सौ. आलका सुज्ञान कांबळे.
यावेळी पंचायत समितीचे सदस्य चित्तरंजन आण्णा सरडे, सरपंच सत्तार शेख, शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.