नळदुर्ग :- लोहगाव ता. तुळजापूर येथे शिक्षक दिन व लोहगाव नगरी चे उपसरपंच प्रशांत देशमुख, सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद काटकर व आदर्श शिक्षक प्रविण काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे निवृत्त शिक्षकाचा सत्कार, गाव पातळीवर आदर्श शिक्षक पुरस्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गावातील विठ्ठल मंदिरात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्या मध्ये गावातील युवकाने व महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.

त्या नंतर संध्याकाळी वाढदिवसा निमित्त भव्य नागरी सत्कार आयोजन करण्यात आला होता. त्या वेळी प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते, हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत भैय्या युवा मंच च्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतले. 

 
Top