तुळजापूर :- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शिक्षणमहर्षी डॉ .बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधुन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन पुणे येथील युनिक ॲकॅडमीचे इंद्रजित यादव यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना यादव म्हणाले की, आज जन्माला आलेले प्रत्येक मुल हे या स्पर्धेत सामिल होत आहे.किंबहुना स्पर्धेला पर्याय नाही,समाजव्यवस्थेमध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठीच प्रशासकीय सेवा कार्यरत आहेत,या परीक्षांसाठी अभ्यास केलेल्या ज्ञानाचे पृथकरन केलेच पाहीजे,ध्येय लवकर निश्चित करणे आवश्यक आहे.अभ्यासात सातत्य ठेवण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.एम.मणेर म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी समयसूचकता असणे गरजेचे आहे.स्वप्ने मोठी असावित व ती पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करावे,नियोजना शिवाय आपण आपले ध्येय प्राप्त करु शकणार नाहीत. शेवटी विद्यार्थ्यांना वाचनाचा ध्यास असावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदर विभागाचे चेअरमन प्रा.मारुति लोंढे यांनी केले तर सूञसंचलन प्रा.गोकुळ बाविस्कर यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनि मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा.बालाजी नगरे यांनी मानले.