तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :-

 तालुक्यातील बारूळ येथील जि.प. प्रियदर्शनी बारुळ शाळेत काल बुधवार दि ५ रोजी  विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

तालुक्यात बारूळ वस्तीवर असलेल्या जि.प.च्या प्रियदर्शनी शाळेतील विद्यार्थ्यांना काल बुधवार दि ५ रोजी  शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ भालेकर ,उपाध्यक्ष सलीम शेख ,सदस्य अमर जडे ,आदी च्या प्रमुख उपस्थितीत गणवेश बुट आणि साँक्स चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्रीदेवी जडे, अरुणा माने, समाधान लोखंडे ,मुअ अजित माळी, अतुल माळी आदीसह विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
 
Top