उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथे गुरुवार दि. 6 सप्टेंबर रोजी शासकीय स्त्री रुग्णालयात नवजात बालकांना साहित्य वाटप आणि महिला रुग्णांना अल्पोपहारचे फराळाचे वाटप करण्यात आले तसेच रूग्णालयातील परिचारिका भगिनींना अतिदक्षता विभागात आणि ऑपरेशन विभागात वापरण्यासाठी स्लीपर चे वाटप करण्यात आले .
काँग्रेस पक्ष स्त्री रुग्णालयातील अडी अडचणी सोडवण्यासाठी डॅाक्टर, प्रशासन त्यांच्यासोबत यापुढे कायम मदत करेल अशी ग्वाही महिला कर्मचारी भगिनींना देण्यात आली. कार्यक्रमास शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, युवक अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, जावेद काझी, अॅड विश्वजीत शिंदे, राम कदम, अझहर पठाण, अॅड राहुल लोखंडे, प्रसन्न कथले, शकील सय्यद, प्रमोद कोऱ्हाळे. किरण शेटे यांच्यासह युवक सहभागी होते.