तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात पेढाभट्टी चालकाकडुन भेसळयुक्त पेढा वापरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक होत असल्याची तक्रार अन्न भेसळ युक्त प्रशासन कार्यालय उस्मानाबाद यांच्याकडे गुरुवार दि. ६ सप्टेंबर तुळजापुर येथील सचिन विठ्ठलराव कदम यांनी केली आहे.
अन्न भेसळ प्रशासनाकडे दिलेल्या एका लेखी निवेदनाद्वारे असे म्हटले आहे की, तुळजापुर क्षेञ हे साडेतीन शक्ती पीठापैकी एक पीठ असल्याने या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात हजारो लोक श्री देवीच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी जात असताना पेढा प्रसाद घेऊन जात असतात. माञ शहरातील पेढा विक्रेते पेढा भट्टी वाल्याकडुन भेसळ पेढा घेऊन ताटा मध्ये पेढा उघड्यावर ठेवतात, २० ते ३० दिवसाचा शिळा पेढा त्याच्यावर ना? उत्पादनाची तारीख नसते तसेच ताज्या पेढ्यामध्ये शिळा पेढा मिक्स करुन एक प्रकारे श्री देवी भक्तांची दिशाभुल करुन भाविकांच्या जिविताशी खेळण्याचा प्रकार पेढा भट्टी वाल्याकडुन सुरु असल्याची आरोप करुन या भेसळ युक्त पेढ्यामुळे होणाऱ्या विषबाधा, व जिवितहानी टाळावी व होत असलेल्या गैर प्रकारा बाबत संबंधित प्रशासनाने करडी नजर ठेवुन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर सचिन विठ्ठलराव कदम यांची स्वाक्षरी आहे.