तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :-  

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ च्या रस्ता रुंदीकरणात नगर परिषदेने भेदभाव न करता योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणेबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि. ५ सप्टेंबर रोजी तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुळजापूर यांना देण्यात आले.

निवेदनात असे नमूद केले आहे की, नगर पालिका हद्यीतुन नागपूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ हा रस्ता जात आहे.  न.प. कार्यालयाकडून रस्ता रुंदीकरणाच्या कामात भेदभाव केला जात आहे. काही ठराविक नगरसेवकांच्या दबावाखाली चुकीची भूमिका घेतली जात आहे.  रस्ता रुंदीकरण होत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजू समान अंतर घेऊनच हा रस्ता होणे अपेक्षित आहे.  यानंतर आक्षेप होणे उचित होईल पण तसे न होता, उत्तरेकडे ६ मीटर, तर दक्षिण बाजूस १२ मीटर हा कुठल्या कायद्यात बसते. सध्या महाराष्ट्र प्रादेशि नियोजन व नगर स्थापना अधिनियम १९६६ चे कलम ३७/१ अन्वये काढल्या गेलेल्या रस्ता रुंदीकरणाचा अध्यादेश हा चुकीचा आहे, समान तत्त्वावरती नसल्याने, आपणाकडून दोन्ही बाजूंचा विचाराअंती शासनास आपली योग्य ती बाजू मांडावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रश्नी मनसे स्टाईलने लढा उभा करण्यांचा ईशारा निवेदनाव्दारे देण्यांत आला. 

सदर निवेदनाच्या प्रत जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना देण्यात आली. निवेदनावर माजी जिल्हाध्यक्ष अमरराजे कदम, शहराध्यक्ष धर्मराज सावंत, शहर उपाध्यक्ष अविनाश पवार, शहर सचिव वेदकुमार पेंदे, जिल्हाध्यक्ष मनविसे (सां.वि.) प्रमोद कदम, समीर शेख, अमीर शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top