तुळजापुर (कुमार नाईकवाडी) :-
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वतीने तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविदयायातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या संदर्भात श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य यांच्या मार्फत उच्च तंञ शिक्षण कार्यालय औरंगाबाद यांना गुरुवार दि. ६ सप्टेंबर एक लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स.न.२०१७/१८ फस्ट इअर व सेकंड इअर / च्या विद्यार्थ्यांना इ.बी.सी. शिष्यवृती सवलत अद्यापही मिळाली नाही तसेच महाविद्यालयातील मागील २ ते ३ वर्षातील टिविशन फीस अद्याप झालेली नसुन ती समाज कल्याण कार्यालय उस्मानाबाद मार्फत लवकरात लवकर प्राप्त करुन द्यावी. या निवेदनावर राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष दुर्गेश सांळुके, सागर गंगणे, समर्थ पैहलवान, दिपक निकम, विनायक सिरसट आदीसह विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी आहेत.