तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :-
उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्रातील व्यवस्थापन शास्त्र विभागाची विद्यार्थिनी दिपाली अंबादास भस्मे हिने विद्यापिठातुन प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकावले.
दिपाली भस्मे हिला दत्तात्रय व्यंकटेश पेठे सुवर्णपदक, वर्कहार्ड सुवर्णपदक, लेट गंगाधर दामोधर बापट बक्षीस, आर.एस. पन्नालाल लाहोटी हैद्राबाद स्मारक बक्षीस घोषित झाले आहे. या निमित्ताने नुकतेच विद्यापिठात तिचा सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल दिपालीचे विद्यापिठ उपकेंद्राच्या संचालिका डॉ.अनार साळुंखे, व्यवस्थापन शास्त्र, विभाग प्रमुख डॉ. सुयोग अमृतराव, प्रा.सचिन बसैय्ये, प्रा.विक्रम शिंदे, प्रा.वरुण कळसे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.