लोहारा (इकबाल मुल्ला) :-

लोहारा काँग्रेसच्यावतीने शहरात उस्मानाबाद जि.प. विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त लोहारा हायस्कुल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कराटे शिबीर कार्यक्रम घेण्यात आला. तसेच लोहारा तालुका ग्रामिण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी समन्वय समिती माजी अध्यक्ष नागण्णा वकील, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोकणे,जिस्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी, अँड.विश्वनाथ पत्रिके, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. आर.यु.
सुर्यवंशी, कॉग्रेस शहराध्यक्ष के.डी.पाटील, युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, विठ्ठल वचने पाटील, बापु जट्टे, मुख्याध्यापक एस.एन.पांचाळ, डी.एम.पोतदार,  नगरसेवक आरीफ खानापुरे, रहेमान मुल्ला, श्रीशैल स्वामी यांच्यासह कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top