नळदुर्ग :- नळदुर्गसह परिसरात अवैध्द वाळू वाहतूक व साठा खुलेआम सुरू आसून महसुल व पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील आनेक भागात अक्कलकोट मार्गे वाळू घेऊन आलेले हायवा ट्रक पहाटे व सकाळच्या सुमारास  बिनबोभाट रिकामे करून वाळू तस्कर पसार होत आहेत. 

वाळू उपश्यावर शासनाने बंदी घातली असताना नळदुर्गसह परिसरात पहाटेच्या सुमारास अक्कलकोट मार्गे वाळूची चोरटी वाहतूक सुरू असून गुरूवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता नळदुर्गमध्ये अशीच हायवा ट्रक दोन ठिकाणी वाळू टाकून पसार झाली. महसुल प्रशासनाने चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथक नेमले आहे. माञ हे पथक  फक्त कागदावर असल्याचे दिसत आहे. नळदुर्ग  अक्कलकोट रोडवर आनेक हायवा ट्रक चोरटी वाळू घेऊन येताना सामान्यांच्या नजरेस पडत  आहेत. माञ महसुल व पोलीस प्रशासनास ही चोरटी वाळू वाहतूक का दिसत नाही? असा प्रश्न उपस्थित होत  आहे.


 
Top