नळदुर्ग :

गणेशोत्सव व मोहरम या सणाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग पालिकेने  सर्वच भागातील रस्त्याची डागडुजी सुरू केली असून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून खडी व मुरूम टाकून रस्ते व्यवस्थित केले आहेत.  मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, नगराध्यक्षा रेखाताई  जगदाळे यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव व मोहरम या दोन्ही सणादरम्यान सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. 

शहरातील रस्त्यांची खड्डे पडून आवस्था अतिषय वाईट झाली असून पालिकेने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर  शहरातील बोरी नदी विसर्जन स्थळ ते मिरवणूक मार्ग, किल्ला गेट मुख्य रस्ता मार्गे बसस्थानक,  माऊली नगर, शास्ञी चौक ते राष्ट्रीय महामार्ग, आंबाबाई मंदिर मार्ग, शास्ञी चौक नानीमाँ दर्गा  ते बालाघाट महाविद्यालय मार्ग आदी भागातील रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी  गुरूवार दि.१३ रोजी सायंकाळी शहरात फेरफटका मारून नागरिकांशी संवाद साधला. अवास्तव खर्चास फाटा देणारे, कायमस्वरूपी गणपती मुर्ती आणलेल्या धर्मवीर संभाजी मंडळ व जय भवानी तरूण मंडळाचे जगदाळे यांनी  विशेष कौतूक केले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक महालिंग स्वामी, सिराज काझी, सिकंदर काझी आदीजन उपस्थित होते.

 
Top