तुळजापूर : कुमार नाईकवाडी
तालुक्यातील सिंदफळ येथील ग्रामपंचायतच्या उप-सरपंचपदी अभिजीत नेताजी धनके यांची दि. १४ रोजी बिनविरोध निवड करण्यांत आली.
माजी उपसरपंच सुदर्शन पांढरे यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याने अभिजीत धनके यांची सिंदफळ ग्राम पंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यांत येवून त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व ग्राम पंचायतीचे सदस्य उपस्थित होते. सरपंच सौ.छाया बालाजी शिंदे यांनी नुतन उप-सरपंच अभिजीत धनके यांना शुभेच्छा देवून, ग्राम पंचायतीचे सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी ग्राम पंचायत सदस्या सौ.सुषमा खुंटाफळे, सौ. लक्ष्मी बंडगर, नंदा घागरे, सौ.वैशाली शिंदे, तसेच ग्राम पंचायत सदस्य, माजी उप-सरपंच सुदर्शन पांढरे, रियाज बागवान, अनंत ढाले, अमोल माळी, समाधान घाटशिळे, धैर्यशिल आबा कापसे, युवक तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली उप-सरपंच अभिजीत धनके यांची निवड करण्यांत आली. यावेळी दामोधर घागरे, अशोक खुंटाफळे, क्रांती धनके, दिनेश धनके, रामेश्वर माळी, पोलीस पाटील शिवाजीराव पाटील, अमोल बंडगर, शिवाजी खुंटाफळे, त्याचबरोबर सिंदफळ येथील ग्रामस्थ व ग्राम पंचायत सदस्य आदीजण उपस्थित होते.
