तुळजापूर : कुमार नाईकवाडी

मुंबई येथील महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेला "लाल बागच्या राजा" चरणी साडे तीन शक्ती पिठापैकी एक पिठ म्हणुन ओळखले जाणारे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी माते चरणी लावुन अकरा किलो वजनाची व सहा फूट लांबीची देवीची प्रतिमा असलेली मानाची श्री तुळजाभवानी देवीची १००८ अंबुका कवड्याची माळ तयार करण्यात आली आहे. या माळेची किंमत ५१ हजार रुपये एवढी असून वजन ११ किलो आहे. उंची ६ फुट व हि अंबुका कवड्याची माळ तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला होता. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणरायाच्या आगमनादिवशी  अंबुका कवड्याची माळ महंत श्री तुकोजी बुवा यांनी देवी चणी लावून शुभाशिर्वादाने मोठ्या भक्तीभावनाने अर्पण करण्यात आली.

यावेळी लालबागचा राजा ट्रस्टचे कार्याध्यक्ष राजू सावंत, श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशालभैय्या रोचकरी, महंत तुकोजीबुवा तसेच मित्र परिवार आदीजण उपस्थित होते.

 
Top