तुळजापूर : कुमार नाईकवाडी / दास पाटील
शेती उदयोग सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे तोटयात जात असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदे सुरु करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आ.मधुकरराव चव्हाण यांनी केले.
जिल्हा उदयोग केंद्रच्या वतीने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पशुपालन व दुग्धव्यवसायावर आधारित उदयोजक्ता प्रशिक्षण कर्यक्रमांच्या उदघाटन प्रसंगी मोर्डा येथे आयोजित कार्यक्रमात आ. चव्हाण हे बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत जि.प.सदस्य धिरज पाटील, रसिक वाले, शरणाप्पा कबाडे, प्रकल्प अधिकारी पांडूरंग मोरे, व्याख्याते अशोक चव्हाण, सरपंच राजाभाऊ शेंडगे आदीजण. उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, सध्या पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्यात असून 50 % पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जोडधंदयाच्या माध्यमातून संकटावर मात करता येईल. मोर्डा हे गाव तुळजापूर शहराच्या जवळ असून दुग्धव्यवसायासाठी मोठया प्रमाणात वाव आहे. या फायदा प्रशिक्षणार्थी महिलांनी घेण्याचे आवाहन ही आ.चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमास पोलिस पाटील किशोर पाटील, बाजीराव सातपुते, माजी सरपंच बाबुराव मदने, मुकेश जाधव, महादेव सुरवसे, सुमित सुरवसे यांचे सह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या. अतिशय छोटया गावात निवासी प्रशिक्षण सुरु केल्याने आ. चव्हाण यांनी जिल्हा उदयोग केंद्राचे अभिनंदन केले.
