तुळजापूर : दास पाटील / कुमार नाईकवाडी
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी कार्यकर्त्यानी जोमाने कामाला लागावे असे आवाहन आ.मधुकरराव चव्हाण यांनी केले. ते तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा पं.स.गटातील गावातील बुथ कमिटी सदस्यांच्या बैठकीमध्ये काक्रंबा येथे आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी जि.प.माजी अध्यक्ष धिरज पाटील, जि.प.चे माजी बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष अमर मगर, उपाध्यक्ष रसिक वाले, माजी उपसभापती साधु मुळे, जि.प.सदस्य बालाजी बंडगर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, भाजप सरकारच्या काळामध्ये समाजातील सर्व घटकांना आश्वासना शिवाय काहीही मिळाले नाही. सध्याचे सरकार हे घोषणाबाज सरकार असून जाहिराती शिवाय काहीही केलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यानी जनतेमध्ये जाऊन या सरकारचे अपयश सांगावे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या भाववाढीने जनतेचे कंबरडे मोडले आहे. शेतीमालाला भाव नाही. या सरकारवर कोणत्याही समाजघटकाचा विश्वास राहिलेला नाही. यावेळी धिरज पाटील, अमर मगर, आप्पासाहेब पाटील यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी लक्ष्मण शिंदे, रामराव पाटील, शंकर कोरे, शहाजी सुपनार,शरणाप्पा कबाडे, अमृत जाधव, बाबा श्रीनामे, मोहन घोगरे, भिमराव लोखंडे, बाबा इंगळे, शिवाजी भोसले, साहेबराव जाधव इ. कार्यकर्त्यासह काक्रंबा व परिसरातील युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
