अक्कलकोट : रियाज सय्यद
तालुक्यातील वागदरी येथील श्री परमेश्वर पर्व पालखी महोत्सव भव्य मिरवणूक भक्तीमय वातावरण सुरवात झाली असून गावातील पालखी मार्गावर सध्या पालखी असून त्याच्या सोबत अनेक कला पथक संघ आहेत.
तसेच गावातील नागरिक पालखीला पाणी वाहून स्वागत करत आहेत श्रीफळ वाढून आपली मनोकामना पूर्ण करत आहेत एकूण पाच पालखी आहेत त्यात मुख्य पालखी श्री परमेश्वराची इतर पालख्या गावातील इतर देवाची आहेत.
आपल्या घरासमोर पालखी आल्यानंतर भाविक दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. गावभार पालखी फिरणार असून राञी ९ दरम्यान पुन्हा पालखी लवाजमा सह मुख्य मंदिरात आगमन होईल.


