तुळजापूर : कुमार नाईकवाडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत स्नेहा बाबुराव गायकवाड हीने रौप्यपदक पटकाविले. तुळजापूर तालुक्यातील कुस्तीच्या मातीतील ही महिला मल्ल गेल्या पाच वर्षा पासून सतत विविध स्पर्धेत यश संपादन करीत आहे.

यषवंतराव चव्हाण महाविद्यालयातील बी.ए.प्रथम वर्गाची विद्यार्थीनी कु.स्नेहा बाबुराव गायकवाड हीने 53 किलो गटात वैद्यनाथ महाविद्यालय परळी वैजीनाथ येथे पार पडलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्तीत घवघवीत यश संपादन करुन रौप्य पदक पटकाविले. बाल वयातच घरातून तीला कुस्तीचे धडे मिळाले. 

शाळा व कनिष्ट  महाविद्यालय स्तरावरही तीने अनेक पारितोषके मिळवली असून महाराष्ट्र  व कर्नाटकातील अनेक कुस्ती फडात तालुक्यातील या महिला पैलवान विद्यार्थीनीने हे यश मिळवले आहे. या यषाबददल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी परिवहन मंत्री आ. मधुकरराव चव्हाण, कार्याध्यक्ष माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, संस्थापक सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर, सचिव उल्हास बोरगांवकर, उपाध्यक्ष संभाजीराव बाभळगांवकर, संचालक बाबुराव चव्हाण, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, जिमखाना विभागाचे प्रा. विलास राठोड, सिनेट सदस्य प्रा.संभाजी भोसले, अधीक्षक धनंजय पाटील यांनी तीचे अभिनंदन केले आहे.

 
Top