अक्कलकोट : रियाज सय्यद

मोट्याळ ता. अक्कलकोट येथे मोहरमनिमित्त शहादतच्या  दिवशी सायंकाळी ५ वाजता यासीन फुलारी मित्र मंडळ यांच्याकडून शरबत वाटपाचे कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रम अतिशय भक्तिभावाने पंजाची  प्रतिष्ठापना करण्यात येते. 

गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र असलेला मोहरम सणा निमित्ताने परंपरिक जपले जाते. त्याचे प्रतीक म्हणून परिचित आहे सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन मोहरम उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक दर्शनासाठी येतात. यानिमित्ताने शहादत च्या दिवशी शरबत  वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यासीन फुलारी, सलमान जमादार,तजमुल शेख, सलीम शेख, मुस्तफा मुल्ला, महेबुब शेख, अमीन मुल्ला सलमान मुल्ला,उस्मान शेख, युनूस मुल्ला,फारुख शेख, वाजीद कुरणे, अजर शेख, शिरीष सुरवसे माहिबूब मुजावर आदीनी पुढाकार घेतला.
 
Top