उस्मानाबाद :

उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सवात होणा-या शिस्तबध्द विसर्जन मिरवणूक आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहात करण्यात येणार आहे. यावेळी टाटा धरणातील पाणी प्रश्नाचे अभ्यासक प्रफुल कदम लिखीत ’हे पाणी आमंच...’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.  

तसेच यावेळी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा उस्मानाबाद भुषण पुरस्कार जेष्ठ क्रिकेट परिक्षक राम हिरापुरे (उस्मानाबाद), कृषी भुषण पुरस्कार उमेश नायकिंदे (पाठसांगवी, ता. भूम), सामाजिक कार्यगौरव कृतज्ञता पुरस्कार हा बिनव्याजी कर्ज पुरवठा करणाऱया राहत क्रेडीट को - ऑप सोसायटी, उस्मानाबाद यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.  

उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे 2017 मध्ये घेण्यात आलेल्या शिस्तबध्द गणेश विसर्जन मिरवणूक आणि उत्कृष्ट देखावा स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण, माजी राज्यमंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर, जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलिस अधिक्षक आर राजा हे प्रमुख पाहुणे म्हणून तर भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, शिवसेना जिल्हासहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  

तरी या कार्यक्रमास शहरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने  अध्यक्ष महेश पोतदार, सचिव विशाल सोनटक्के, उपाध्यक्ष देवीदास पाठक यांच्यासह पत्रकार कमलाकर कुलकर्णी, अनंत आडसूळ, दिलीप पाठक - नारीकर, राहुल कुलकर्णी, सयाजी शेळके, राजेंद्र जाधव, चंद्रसेन देशमुख, रवी केसकर, चेतन धनुरे, भिमाशंकर वाघमारे, तानाजी जाधवर, बाळासाहेब मुदंडा, बालाजी निरफळ, बाबुराव चव्हाण, प्रविण पवार, गणेश कुलकर्णी, जी. बी. रजपूत, हुंकार बनसोडे, अमर भातलवंडे, विजय मुंडे, उपेंद्र कटके, राकेश कुलकर्णी, कालिदास म्हेत्रे, राहुल कोरे, आरिफ शेख, बाळासाहेब अणदूरकर, इस्माईल सय्यद आंदिनी केले आहे.  

 
Top