उस्मानाबाद : तालुक्यातील भंडारवाडी येथील दहा ते चौदा वयोगटातील बालकांच्या शूरवीर गणेश मंडळाने गणेशोत्सवात व्यसनमुक्ती व ग्रामस्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. 

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत अनावश्यक खर्च व इतर कार्यक्रमांस फाटा देवून या बालगणेश मंडळाने दारूबंदी, गुटखाबंदी व धुम्रपानविरोधी फलक हाती घेवून घोषणाबाजी करत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. शूरवीर बालगणेश मंडळ चमूने आगळ्यावेगळ्या उपक्रमाने गावातील तरूण व नागरिकांच्या डोळ्यात अंजन घातले. ग्रामस्वच्छता मोहिमेअंतर्गत गाव स्वच्छ करण्याचा संकल्प या बाल गणेश मंडळाने हाती घेतला आहे. गणेश मंडळातील अभिषेक खटके, आदीत्य जहागीरदार, राणा पाटील, सौरभ पाटील, सार्थक पाटील, हरिओम भांगे, पार्थ कुलकर्णी, चैतन्य माळी, श्रीकांत माळी आदींच्या चमूने यात भाग घेतला असून या मंडळास राम पाटील यांनी मार्गदर्शन केले. अत्यंत कमी वयात सामाजिक प्रश्न व उपक्रम राबविल्यामुळे या बालगणेश मंडळाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

 
Top