उस्मानाबाद :

उस्मानाबाद शहराजवळ कार्यरत असणाऱ्या तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था, पानगाव संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह / शाळा, विमानतळ रोड, आळणी या बालगृहातील मतिमंद मुलींना विशेष शिक्षण व व्यावसायिक शिक्षण घेता यावे, यासाठी संस्थेकडून या बालगृहासाठी संलग्न शाळा व कार्यशाळा यासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्याचा मानस होता. त्यास अजित पिंगळे यांच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांनी या इमारतीच्या बांधकामाकरिता त्यांच्या खासदार निधीतून 19 लाख 50 हजार इतका निधी संस्थेस दिला. त्यास रितसर तांत्रिक  मान्यता मिळून या वर्गखोल्या बांधकामाचा कार्यादेश मिळाल्याने पालकमंत्री अर्जुन खोतकर व खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते  भूमीपूजन  समारंभ काल (दि.17 सप्टेंबर) रोजी संपन्न झाला.

 या इमारतीच्या बांधकामासाठी साठ लक्ष रुपये खर्च येणार असून उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते मनोगत शिनगारे यांनी व त्यांच्या मित्रांनी मिळून दोन लाख रुपये संस्थेत प्रदान केले आहेत. 

या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, ओमराजे निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन शेरखाने, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार विजय राऊत, कैलास पाटील, अनिल खोचरे,गौतम कटके, उपनगराध्यक्ष सूरज साळुंखे, नितीन लांडगे, अजित पिंगळे,  अजित लाकाळ,   पत्रकार अनंत आडसूळ,  रविंद्र केसकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे आदि मान्यवर उपस्थित होते.


 
Top