उमरगा (लक्ष्मण पवार) :-
तलमोड ता. उमरगा येथे शुक्रवार दि. 7 सप्टेंबर राजे उमाजी नाईक यांची जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उमाजीराजे नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच तलमोड येथील राजे उमाजी नाईक मंडळातर्फे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तू जाधव, सरपंच मनिषाताई सुगिरे, उपसरपंच माधव शिंदे, राहुल मोरे, पोलीस पाटील पवन स्वामी, मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर व्हनाळे, उपाध्यक्ष गणेश मंडले, महारुद स्वामी, विठ्ठल सास्तुरे, लिंबराज चेंडकापूरे, कन्हेय्या बोकले, शाळेचे मुख्याध्यापक बेंबळकर सर, विराज मोरे, राहुल सुर्यवंशी, राजेंद्र सुगिरे, सुधाकर भोसले, शिवराज व्हनाळे आदीजण उपस्थित होते.