तुळजापूर : कुमार नाईकवाडी

येथील प्रेरणा व नवनिमिॅती बहुउद्देशिय सामाजिक महिला संस्थेचा वतीने एकल महिलासाठी कार्यशाळा घेण्यात आली. एकल महिलांच्या विषयी त्याच्या समस्या व प्रश्न या विषयीचे मार्गदर्शन महिला आयोग उस्मानाबाद जिल्हाचे समन्वयक खरात सर यांनी केले. एकल महिलासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. 

संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई सोमाजी यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाले की, अशा महिलानी परिस्थितीचा सामना करीत स्वतःला सिद्ध करावे व सक्षम महिला म्हणून जगाला ओळख दाखवली पाहिजे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सौ. संध्या खुरूद, सौ. श्रीदेवी वेदपाठक, सौ. रूपाली घाडगे, सौ. अरूणा कावरे, सुवर्णा उपाम यांनी परिश्रम घेतले.

 
Top