काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर  तालुक्यातील तामलवाडी पोलीस  स्टेशन  अंतर्गत  गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेत साजरा होण्यासाठी  व या उत्सव कालावधीत  कुठलाही  अनुचित प्रकार घडू नये  यासाठी  तामलवाडी  पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून 94 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून  दहा  दिवस  चालणाऱ्या  गणेशोत्सवात तामलवाडी  पोलिसांच्या वतीने  प्रत्येक  गावात चोख पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक  चौरे  यांनी दिली. 

तामलवाडी  पोलीस ठाण्या अंतर्गत  एकूण  27 गावांचा समावेश  असून या गावातून  59 मंडळे असून 50 मंडळानी गणेश  स्थापनेसाठी परवाना काढली असून  9  मंडळे विनापरवानाधारक आहेत. उर्वरित  9 विनापरवानाधारक मंडळानाही परवानगी  काढण्यासाठी सुचना  केली असल्याची माहिती सपोनि अशोक  चौरे यांनी दिली आहे.        
           
तामलवाडी  पोलीस स्टेशन अंतर्गत  एकूण  27 गावे असून  तामलवाडी  पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक  चौरे यांनी तामलवाडी  पोलिसांच्या वतीने  प्रत्येक  गावात शांतता समिती  व गणेशोत्सव  मंडळाची बैठक घेऊन एक गाव एक गणपती साकारण्याचे आवाहन केले होते.   पोलिसांच्या  आवाहनाला  प्रतिसाद  देत 27 गावामधून  वडगाव (काटी ), कदमवाडी, यमगरवाडी, जळकोटवाडी,  खडकी,  व गंजेवाडी या सहा गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना  प्रत्येक्षात साकारून एकात्मतेचे  दर्शन  घडविले  जात आहे.  

 
Top