लोहारा : इकबाल मुल्ला
सह्याद्री फाउंडेशन्स व चॉईल्ड लॉईन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील बेंबळी येथील जि.प.प्रा.शाळेत दि. 14 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 1098 या टोल फ्रि नंबरची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राज्य शासनाच्या बालरक्षा अभियानाचीही सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. सभापती बालाजी गावडे होते. तर प्रमुख म्हणुन सह्याद्री फाउंडेशन्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दापके देशमुख दिग्गज, बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ.ए.डी.कदम, माजी उपसरपंच बाळासाहेब माने, उपसरपंच सत्तार शेख, गौस पठाण, नवाब पठाण, सामाजिक कार्यकर्ते मजहर पठाण, डॉ.इलियास खान, इकबाल मुल्ला, दादासाहेब कोरके, अनिल जाधव आदीजण उपस्थित होते.
यावेळी सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास जि.प.प्रा.शाळा, जि.प.कन्या प्रशाला, जि.प.प्रा.शाळा, जि.प.उर्दु प्रा.शाळा या चार शाळांनी सहभाग घेतला होता. यावेळी आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सह्याद्री फाउंडेशन्सचे संस्थापक डॉ.दापके देशमुख दिग्गज यांनी 1098 टोल फ्रि नंबरची जनजागृती याविषयी विद्यार्थ्याना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शहेनाज औसेकर यांनी केले. तर आभार गजानन पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक विक्रम पाटील, ए.ए.खतीब, सतिश पवार, सय्यद खमरुद्दीन, महेश पाटील, तुकाराम राऊत,अहेमद पटेल यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
