तुळजापूर : कुमार नाईकवाडी
काक्रंबा ता. तुळजापूर गावातील एका १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांस डेगूंची लागण झाल्याने ग्रामस्थां मध्ये एकच खळबळ उडाली असुन काक्रंबा गावात डेंगूची लागण झाल्याचे कळताच खडबडुन जागे झालेल्या व गेली सहा महिन्या पासुन गायब असलेल्या आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक आज शुक्रवारी गावात दाखल झाले होते.
तुळजापूर तालुक्यातील आठ हजार लोकसंख्येच्या काक्रंबा येथील वृषभ राजकुमार गडदे या १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थी गेल्या सहा ते सात दिवसा पासुन तापाने फणफणत असल्याने सुरूवातीला घराच्यानी त्याला उपचारासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. माञ त्या ठिकाणी एकही अधिकारी नसल्याने उपस्थित असलेल्या नर्सनी सदरील विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करून उपचार करण्यापूर्वीच त्याला उपचारासाठी तुम्ही खासगी रूग्णालयात घेऊन जा असा सल्ला दिला. त्यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी त्याला तुळजापूरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या सर्व तपासणी केल्यानंतर सदरील विद्यार्थ्यांला डेगूंची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले.
माञ सलग चार दिवस औषध उपचार केल्यानंतर सदरील विद्यार्थ्यांचा आजार आटोक्यात आल्यानंतर घरी सोडण्यात आले. याच विद्यार्थीला डेंगूची लागण झाल्याची सलगरा दि प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना कुणकुण लागताच गेली सहा महिन्या पासुन अधिक काळ गायब झालेले आरोग्य विभागाचे सात ते आठ अधिकारी कर्मचारी आज सकाळी गावात दाखल झाले व संपूर्ण गावात दुपारी दिड वाजेपर्यंत फिरून गावातील पाणी साठे कोरडे करून अँबेट करून १४ रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळं गेली सहा महिने फक्त लसीकरणाला तोंड दाखवणारे आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावात, मुख्यालयात राहुन ग्रामस्थांना आरोग्य सेवा पुरवल्या असत्या तर असे साथीचे आजार उदभवणार नाहीत. माञ सदरील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कसले हि वचक नसल्याने सलगरा दि प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक हि अधिकारी कर्मचारी मुख्यालया च्या ठिकाणी न राहता फक्त लसीकरणाला येतात त्यामुळे संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांमधुन होत आहे.
पथकात यांचा होता समावेश
काक्रंबा गावातील १६ वर्षीय विद्यार्थी वृषभ राजकुमार गडदे याला डेंगूची लागण झाल्याचे समजताच जिल्हा हिवताप अधिकारी एन.एस.बोरकर, तालुका पर्यवेक्षक आनंदा आगळे, अमोल आदटराव, आरोग्य सहाय्यक सतिश कोळगे, एन.एस. मोरे, एन.एस.कुलकर्णी, ए.एस.शिंदे, पी.डी. रेडडी, आरोग्य सेविका भालेराव यांच्यासह 8 ते 10 आरोग्य कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गावात फिरवून सर्वेक्षण केले.
म्हणे संशयत रूग्ण आहे लागण झालीच नाही
या बाबत आरोग्य सहायक सतिश कोळगे यांना विचारले असता ते म्हणाले सदरील रूग्ण हा डेंगू संशयत असुन त्याला डेंगूंची लागण झाली नसल्याचा त्यांनी दावा केला आहे .
