लोहारा : इकबाल मुल्ला
लोहारा तालुक्यातील खेड येथील सहशिक्षिका श्रीमती महानंदा चव्हाण यांना सोलापुर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात शिक्षक आ.दत्ता सावमत यांच्या हस्ते अपुर्वा अभिमित ज्ञानपीठ राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख म्हणुन माजी आमदार शिवशरण पाटील, माजी शिक्षण संचालक दिलीप सहस्त्रबुध्दे, माजी शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप, अभिमत विदयापिठाचे कुलपती दिलीप भांजे आदीजण उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी तब्बसुम सय्यदा यांनी अभिनंदन केले आहे.
