अक्कलकोट : रियाज सय्यद
अक्कलकोट येथील सोलापूर रोडवरील हजरत सय्यदशाह दातापीर आलमनवाज कादरी दर्गाहचा ७३ वा उर्स २ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०१८ या तीन दिवशी होत आहे, अशी माहिती हजरत सय्यद शाह दातापीर दर्गाचे सज्जादा नसिन सय्यदशाह दातापीरशाह कादरी यांनी दिली.
अक्कलकोट शहर व तालुक्यामध्ये सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून हजरत सय्यदशाह दातापीर दर्गाला मानले जाते. या दर्गाचा उर्स २ ऑक्टोबर मंगळवारी रोजी सुरू होत आहे. या दिवशी गंध निमित्त अक्कलकोट शहरातुन सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर रात्री १० वाजता भजन कार्यक्रम होणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी बुधवारी संदल तसेच हजरत मौलाना सय्यदशाह काजीमपाशा कादरी (हैद्राबाद ) यांचे प्रवचन ( बयान ) होणार आहे. दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. जियारत , महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत. उर्स काळात सलग तीन दिवस महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. हजरत सय्यदशाह दातापीर कादरी रह. यांच्या उर्स निमित्त सर्व धर्मिय भावीकांनी दर्शनाचा तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सज्जादा नसिन सय्यदशाह दातापीरशाह कादरी यांनी केले आहे. याप्रसंगी सय्यदशाह मस्तूर कादरी साहेब, सत्तार बळोरगी,बाबु नागुर,अजिज शेख,रफिक पठाण, जाकिर दरेखा आदी उपस्थित होते.
