तुळजापूर :
गवळेवाडी ता. तुळजापूर येथील मादेवी अनंत माने (वय 32 वर्षे) या महिलेचा स्वाइन फ्लू आजारामुळे सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 22 सप्टेंबर रोजी घडली. त्याचबरोबर अन्य एका मुलास याची लागणी झाल्यामुळे त्याच रुग्णालयात उपचार सुरू असून 9 जणांना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील गवळेगवाडी येथील महादेवी अनंत माने (वय ३२ वर्षे) या आजारी पडल्यामुळे बुधवारी वडाळा (जि. सोलापूर) येथे उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. प्रकृती जास्तच खालावल्यामुळे त्यांना गुरुवारी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
त्याचबरोबर गवळेवाडी गावातील एका चार वर्षीय बालकावर सोलापूर येथील रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या संशयावरून उपचार सुरू आहेत. तसेच अन्य नऊ जणांनाही तपासणीसाठी पाठवले आहे आहे. संपूर्ण गावातील ग्रामस्थांना गोळ्या देऊन औषधोपचार करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता लोंढे यांनी दिली.
