तुळजापुर : कुमार नाईकवाडी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्यामार्फत वाढविण्यात आलेली फीस भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत वाढ देण्यात यावी अशा आशयाचे एक लेखी निवेदन विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने सोमवार दि. २४ सप्टेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या श्री यशवंतराव महाविद्यालयास देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ग्रामीण भागातील व शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील फीस वाढीमुळे आर्थिक अडचनीस सामोरे जावे लागत असल्याने सदरील फीस भरण्यास विद्यार्थ्यांना मुदत वाढ देण्यात यावी अन्यथा विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने काँलेज बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर करण सांळुके, अभिजित शिंदे, शुभम पाटील, कल्याण कोरे, सुदर्शन पेंदे, सुमित दिक्षीत आदीसह विद्यार्थ्यांच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top