तुळजापूर : कुमार नाईकवाडी

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस मोठ्या ऊत्साहात संपन्न झाला.  या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.नेताजी काळे यांनी वरील उदगार काढले.

आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ते म्हणाले की, देशातील युवकांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यासाठी सदर ऊपक्रमाची मोठी भूमिका आहे.२४सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधीच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयीन स्तरावर व्यापक स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना  ऊपक्रम राबविला गेला.या निमित्ताने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग या उपक्रमात नोंदवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. टि.एल.बारबोले, प्रा.डॉ. एम.आर. आडे, प्रा.डॉ. सी.आर. दापके, प्रा. एच.वाय. साळुंखे यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व एन.एस.एस.स्वंयसेवक उपस्थित होते.
 
Top