जळकोट : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील आदर्श पुरस्कार सन्मानित शिवसम्राट गणेश मंडळाने धांगडधिंगाला फाटा देऊन ,या वर्षी मिरवणुकीत लोकप्रबोधनाचे कार्यक्रम सादर करत "श्री" चे दिमाखात विसर्जन केले.गणेश भक्तांची या मंडळाचे कार्यक्रम बघण्यासाठी तुफान गर्दी उसळली होती.

जळकोट येथील केदारलिंग भागातील शिवसम्राट गणेश मंडळ जरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते.गावात एकमेव गणेशक्स मंडळ हे प्रत्येकवर्षी समाजप्रबोधन करत असते.या मंडळाला गेल्यावर्षी जळकोट ग्रा.प.तर्फे आदर्श गणेश मंडळाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

शिवसम्राट गणेश मंडळाने यावर्षी गावात भारुडे गीते ,नाटिका,याद्वारे राष्ट्रीय विविध विषयांवर समाजप्रबोधन केले.यात "वेडी म्हणता मला" या भारुड्यातून "बेटी बचाओ,बेटी पढाओ",स्वच्छ भारत अभियान ,कुटुंब नियोजन ,राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देऊन जनजागरण केले.यात मंडळाचे कलाकार बालाजी पालमपल्ले ,शिवाप्पा कुंभार ,हर्षद स्वामी यांनी भारुड सादर केले तर "कोणीतरी येणार येणार ग "या डोहाळे गीतातून बालाजी पालमपल्ले ,प्रथमेश पालमपल्ले ,साक्षी धरणे, कु.वैष्णवी कागे, बनशंकरी नागठाण यांनी गीतातून विविध संदेश दिले. तर "रक्तचरित्र" भूतांचे गाणे यातून सागर राजमाने ,तेजस कदम, धीरज जाधव, वैभव स्वामी ,संदीप राजमाने यांनी आपली कला सादर केली .विविध गाण्यातून कु.राजलक्ष्मी किलजे व कु.सानिका कदम यांनी अफलातून नृत्य सादर केले. विविध गीतांवर टिपऱ्या, डफली,लेझीम सादर करण्याचे आल्या.

या सर्व कार्यक्रमांना गावकरी ,गणेश भक्त ,महिला ,युवक यांनी तुफान गर्दी केली होती.मंडळाने धांगडधिंगा , कर्णकर्कश आवाजाला फाटा देऊन शांतताप्रिय  मिरवणूक काढली .गावाच्या विविध भागातून ही मिरवणूक निघाली .या मिरावणुकीदरम्यान उत्कृष्टरित्या समाजप्रबोधनात्मक मिरवणूक काढल्याबद्दल ग्रामपंचायततर्फे मंडळाचा माजी जि. प.सदस्य गणेशराव सोनटक्के ,उपसरपंच अर्जुनराव कदम ,तंटामुक्त उपाध्यक्ष अनिल छत्रे,श्री गणेश कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष तथा पत्रकार मेघराज किलजे ,माजी ग्रा.प.सदस्य इरान्ना स्वनने आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हा  कार्यक्रम पाहून अप्पू मल्लिनाथ किलजे यांनी 5151 रु तर अनेक गणेश भक्तांनी मंडळाला भरगोस अशी बक्षिसे दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुरज जाधव ,उपाध्यक्ष तेजस कदम ,सचिव सागर राजमाने ,कोषाध्यक्ष भीमाशंकर पांचाळ ,खजिनदार हर्षद स्वामी व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 
Top